Nagar Update (24 November 2020)
वेब टीम - नगर अपडेट : भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी नुतन पदाधिकार्यांची घोषणा केली. जिल्हाध्यक्षपदी प्यारेलाल शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी मुन्ना शेख, उपाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड, सचिवपदी इमरान तांबटकर यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार एस.के. मोटर्स ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यावेळी एस.के. मोटर्सचे संचालक इमामशहा मोहंमद शेख, आयाज बागवान, छोटू शेख, इमाम शेख, मुसद्दिक सय्यद, शहानवाज शेख, मोहंमद हुसेन, सिकंदर सय्यद, तन्वीर शेख, शहेबाज सय्यद, मोहंमद शेख, शहामोहंमद शेख, नादीर सय्यद, संजय लोखंडे, अजय साळवे, फिरोज सय्यद, जावेद खान, नईम कुरेशी, अजीम शेख, अशोक भास्कर, अय्याज सहारा, सतीश औटी, अविनाश शिंदे, भाऊ लोखंडे, आदेश लोंढे, पै.मन्नान सय्यद, बाबा उमाप, संजय घोरपडे, संजय ताकवाले, बाळासाहेब गोडळकर आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देत नुतन पदाधिकार्यांनी संघटनेने टाकलेल्या जबाबदारी पुर्ण करणार असून, संघटनेच्या माध्यमातून वाहन खरेदी विक्रीसाठी व गाडी पासिंगसाठी येणार्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. प्रत्येक पदाधिकारी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.
ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आमचा 91 194 194 91 हा नम्बर नगर अपडेट नावाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा....

1 Comments
Caesar Casino: Slots, Poker, Roulette - ShootEmCasino.com
ReplyDeleteThe latest online casino game! Play the best real money slots, blackjack, roulette and so much more! Start winning real money on 제왕 카지노 보증 our site today.